Lyrics in Marathi

माझिया प्रियाला प्रीत कळेना

घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे 
नवीन भाषा कोणती नजर काही बोलते 
साऱ्या सरी या माझ्याचपाशी चिंब तू होईना 
माझिया प्रियाला प्रीत कळेना


कळत नकळत

मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती 
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती 
मन वार्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते 
मग कोणा पाहून भुलते सारे कळत नकळतच घडते


सावर रे मना

सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वात हळवी वेचताना 
सावर रे मना सावर रे ,सावर रे सावर रे एकदा , सावर रे 
सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे थेंब ओले झेलताना 
सावर रे मना सावर रे ,सावर रे सावर रे एकदा ,सावर रे


सख्या रे

मी तुझीच रे बावरी सख्या 
तुझेच रे पिसे अंतरी सख्या 
सरी परी सरलास तू तरी मनी उरलास तू
आर्त मी तुषार्त मी तू मृगजळा सारखा 
गीत मी संगीत मी सूर तू रे पारखा
सख्या रे, सख्या रेसख्या रे, सख्या रे


Comments

Most Read Recent Experience